पुणे - लोहगावमधील पठारे वस्तीत भाड्याच्या बंगल्यात गार्डनमध्येच ४१ गांजाची झाडे
पुणे, 28 एप्रिल (हिं.स.)। लोहगाव परिसरातील पठारे वस्ती येथे एका बंगल्याच्या आवारातच गांजाची लागवड करून विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोहगाव पोलिसांनी या कारवाईत गांजाची ४१ झाडे, वाहन आणि मोबाईल असा सहा लाख रुपयांहून अ
grdyr


पुणे, 28 एप्रिल (हिं.स.)। लोहगाव परिसरातील पठारे वस्ती येथे एका बंगल्याच्या आवारातच गांजाची लागवड करून विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोहगाव पोलिसांनी या कारवाईत गांजाची ४१ झाडे, वाहन आणि मोबाईल असा सहा लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

लोहगाव पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार आकाश मोरे आणि अमोल आदलिंग यांना पठारे वस्ती परिसरात गांजाची लागवड सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला.

छाप्यात हर्ष भरतकुमार पांचाल (वय ३०, रा. नमो पॅराडाईज, पठारे वस्ती, लोहगाव) याने भाडेतत्त्वावर घेतलेल्या बंगल्याच्या आवारात गांजाची लागवड केल्याचे उघड झाले. बंगल्याच्या गार्डनमध्ये लहान-मोठी अशी ४१ गांजाची झाडे आढळून आली. या झाडांचे एकूण वजन साडेचार किलो इतके होते. तसेच आरोपी वापरत असलेल्या वाहनातूनही गांजा जप्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande