महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांना गती देण्याचे आ.रमेशअप्पा कराड यांचे निर्देश
लातूर, 28 एप्रिल, (हिं.स.)। महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आ. रमेशअप्पा कराड यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी भिसे, सुरज शिंदे, सतीश आंबेकर, उद्धव काळे, अॅड. दशरथ सरवदे, महेंद्र गोडभरले यांच्यासह अन
आमदार रमेश कराड


लातूर, 28 एप्रिल, (हिं.स.)। महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी आ. रमेशअप्पा कराड यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी भिसे, सुरज शिंदे, सतीश आंबेकर, उद्धव काळे, अॅड. दशरथ सरवदे, महेंद्र गोडभरले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरक्षा प्रशिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, ‘लाडकी बहीण’ योजना, तसेच बालकांच्या आरोग्य व शिक्षणासाठी अंगणवाडी सुविधा, लघुउद्योग अनुदान योजना आणि कुपोषण निर्मूलन यांसारख्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या योजना प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशा सूचना आ. कराड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी जिल्हा परिषद परिसरात भेट दिल्यानंतर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याची झालेली दुरवस्था पाहून आ. कराड यांनी नाराजी व्यक्त केली. परिसराचे तातडीने सुशोभीकरण करून योग्य देखभाल करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कार्यक्रमादरम्यान महेंद्र गोडभरले यांनी आ. कराड यांचा सत्कार करून स्वागत केले. यावेळी दीपक वांगस्कर, बन्सी भिसे, सुधाकर काळे, आदिनाथ मुळे, रमाकांत फुलारी, संजय ठाकूर, उत्तम चव्हाण, अशोक सावंत, ओम चव्हाण, लक्ष्मण यादव, नारायण राठोड, रुपेश काळे, अशोक राठोड, राजेंद्र काळे, सुरेश बुड्डे, बाबा भिसे यांच्यासह महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande