अमरावती : महाराजस्व अभियान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद : 7,500 लाभार्थ्यांना 7.40 कोटींचा लाभ
अमरावती, 28 एप्रिल (हिं.स.) :अमरावती तहसील कार्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आयोजित समाधान विशेष शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे 7,500 लाभार्थ्यांना एकूण 7 कोटी 40 लाख रुपयांच्या विविध श
आ.रवी राणा यांच्या पुढाकारातून ‘महाराजस्व अभियान’ विशेष शिबिर यशस्वी; ७५०० लाभार्थ्यांना ७.४० कोटींचा लाभ


अमरावती, 28 एप्रिल (हिं.स.) :अमरावती तहसील कार्यालयात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत आयोजित समाधान विशेष शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे 7,500 लाभार्थ्यांना एकूण 7 कोटी 40 लाख रुपयांच्या विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या पुढाकारातून हे शिबिर पार पडले. शिबिराचे उद्घाटन आमदार रवी राणा यांच्या हस्ते वयोवृद्ध महिला लाभार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडून रवी राणा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या क्षणाचे स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली.

या शिबिरात 57 शासकीय विभागांनी सहभाग घेत विविध योजनांचे स्टॉल उभारले होते. यामध्ये 25 ट्रॅक्टर आणि 25 मिनी ट्रॅक्टरचे वितरण, 3200 पीआर कार्ड वाटप, उमेद अभियानांतर्गत बँक कर्ज सुविधा, महिला बचत गटांना शिलाई मशीन व पापड मशीन, शेळीपालन योजना, 300 विहिरी, तसेच ‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत 600 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

तसेच 500 शिधापत्रिका, 1200 आयुष्मान भारत कार्ड आणि 600 चष्म्यांचे वाटप करण्यात आले. उत्पन्न, जात व रहिवासी दाखले यांसह विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.

या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ वाचून त्यांना थेट लाभ मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. आमदार रवी राणा यांनी सर्व स्टॉल्सना भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

कार्यक्रमास नवनीत राणा, उपमहापौर सचिन भेंडे तसेच विविध शासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे प्रशासन व नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande