तपोवनातील शेतकऱ्यांशी महापौरांची चर्चा; मोबदल्यावर जागामालक ठाम
नाशिक, 28 एप्रिल, (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील जागा भूसंपादीत करण्याच्या प्रश्नावर सोमवारी महापौर हिमगौरी आडके यांनी नांदुर-मानूर तसेच तपोवनातील जागा मालक शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जागा मालकांनी यापुर्वी सिंहस्थासाठी संपादीत केले
तपोवनातील शेतकऱ्यांशी महापौरांची चर्चा; मोबदल्यावर जागामालक ठाम


नाशिक, 28 एप्रिल, (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील जागा भूसंपादीत करण्याच्या प्रश्नावर सोमवारी महापौर हिमगौरी आडके यांनी नांदुर-मानूर तसेच तपोवनातील जागा मालक शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जागा मालकांनी यापुर्वी सिंहस्थासाठी संपादीत केलेल्या जागेचा अगोदर मोबदला मिळावा तरच आगामी संहस्थासाठी जागा देण्याबाबत विचार करता येईल अशी भूमिका घेतली. याबाबत लवकरच पुन्हा बैठक घेण्याचे महापौरांनी आश्वासन दिले.

तपोवन शेतकरी कृती समितीचे समाधान जेजूरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी महापौर हिमगौरी आडके यांनी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांनीमहापालिकेकडे जागेचा मोबदल्यासाठी केलेला पाठपुरावा, न्यायालयीन आदेश व वेळोवळी झालेल्या बैठकांचा वृत्तांत विषद करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे सांगितले. जागा मालकांशी कोणतीही चर्चा न करता मनपाकडून थेट जागेचा ताबा घेवून कामे सुरू केली जात आहेत. त्याची कोणतीही नोटीस वा जागेची मोजमाप होत नसल्याचे सांगितले.

दोन सिंहस्थासाठी शेतकऱ्यांच्या जागांचे संपादन केले, परंतु अद्यापही मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे आगामी सिंहस्थासाठी शेतकऱ्यांना मोबदला कसा मिळेल व किती मिळेल याचा खुलासा झाल्याखेरीज जागा न देण्यावर ठाम भूमिका घेतली. महापौर हिमगौरी आडके यांनीही या प्रश्नी प्रशासनाकडून माहिती घेण्याचे तसेच शेतकऱ्यांवर अन्याय न होऊ देण्याचे आश्वासन दिले व लवकरच प्रशासनाचे अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक घेवून त्यात सन्मानजनक तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande