
छत्रपती संभाजीनगर, 28 एप्रिल (हिं.स.)।तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी श्री. संतोष बोबडे यांची झालेली निवड ही नक्कीच शेतकरी हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करून मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.त्यांच्या सक्षम आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली बाजार समिती अधिक पारदर्शक, गतिमान आणि शेतकरीकेंद्री होईल, असा ठाम विश्वास आहे. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी ते कटिबद्धपणे कार्य करतील, तसेच नवकल्पना आणि आधुनिक उपक्रमांच्या माध्यमातून बाजार व्यवस्थेला नवे बळ देतील.
------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis