सोलापूर - महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताविरोधात ग्रामपंचायत सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
सोलापूर, 28 एप्रिल, (हिं.स.)। आंबे ता.पंढरपुर येथील प्रताप अँड सन्स व अर्जुनसोंड-मुंढेवाडी ता. पंढरपुर येथील एम.व्ही.एम. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे ठेकेदार वाळू ठेक्यावरती रात्रंदिवस यंत्रसामग्रीने वाळू उपसा करत असल्याची तक्रार दामाजीनगरचे ग्रामपंच
सोलापूर - महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताविरोधात ग्रामपंचायत सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार


सोलापूर, 28 एप्रिल, (हिं.स.)। आंबे ता.पंढरपुर येथील प्रताप अँड सन्स व अर्जुनसोंड-मुंढेवाडी ता. पंढरपुर येथील एम.व्ही.एम. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स हे ठेकेदार वाळू ठेक्यावरती रात्रंदिवस यंत्रसामग्रीने वाळू उपसा करत असल्याची तक्रार दामाजीनगरचे ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब आसबे यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंबे व अर्जुनसोंड-मुंडेवाडी येथून रात्रंदिवस अवैद्य वाळू उपसा सुरू आहे. तसेच दोन ब्रास च्या पावतीवर पाच ब्रास वाळू भरून दिली जात आहे. एका पावती वरती एक गाडी चार ते पाच खेपा करत आहे. बिगर पावतीने दररोज शेकडो गाड्या भरल्या जात आहेत. रात्रभर पोकलेन मशीनच्या व टिपरच्या सहाय्याने वाळू उपसा केला जात आहे. नदीपात्रामध्ये कोणत्याही यंत्रसामग्रीच्या सहाय्याने वाळू उपसा करण्यास परवानगी दिलेली नसतानाही आंबे येथील नदीपात्रामध्ये वाळू ठेक्याच्या ठिकाणी पाणी असताना यंत्रसामग्रीच्या साह्याने म्हणजेच यारी यंत्राच्या साह्याने वीस ठिकाणी यारी यंत्र टाकून रात्रंदिवस वाळू उपसा सुरू आहे. सदरच्या अवैद्य वाळू उपसाबाबत पंढरपूरचे प्रांत अधिकारी सचिन इथापे, पंढरपूरचे तहसीलदार लंगुटे, मंडल अधिकारी पंकज राठोड व तलाठी भाऊसाहेब यांच्याकडे मी वारंवार फोनवरती सदरच्या ठेक्यावरती जाऊन कारवाई करण्याची मागणी केली परंतु अधिकाय्रानी माझा नंबर ब्लॉक केला. काही दिवसांपूर्वी सदरचे मंडलाधिकारी प्रांत कार्यालय पंढरपूर येथे कार्यरत असताना. यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक सोलापूर विभागाने लाच घेताना कारवाई केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande