
जळगाव, 28 एप्रिल, (हिं.स.) - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व गोदावरी अभियात्रिकी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०४ मे, २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, पी-५१, एम सेक्टर अतिरिक्त एम.आय.डी.सी, भुसावळ रोड, जळगाव येथे करण्यात आले आहे.
जिल्हयातील नामांकीत खाजगी आस्थापना, उद्योजक / कंपनी यांना आवाहन करण्यात येते की, या मेळाव्यात सहभागी होणे करीता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home employer या संकेतस्थळावर खाजगी आस्थापना, उद्योजक/कंपनी यांच्या कडील असलेले युजर आयडी व पासवर्डने आपले कडील असलेली रिक्तपदे ऑन-लाईन पध्दतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ऑफलाईन-०२ (२०२६-२७) येथे नोंदवावी. तसेच नविन खाजगी आस्थापना, उद्योजक / कंपनी यांनी उक्त संकेतस्थळावर नोंदणी करुण आपल्याकडील रिक्तपदे या संकेत स्थळावर नोंदवावी.
याबाबत काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी ०९.४५ ते संध्याकाळी ०६.१५) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत दुरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा, असे आवाहन संदिप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर