वंदे भारत अपघातानंतर पुण्यात रेल्वेचा बोजवारा; ८ गाड्या रद्द
पुणे, 28 एप्रिल (हिं.स.)। पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळपासून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तांत्रिक कारणांमुळे आणि ऑपरेशनल अडचणींमुळे तब्बल ८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक गाड्या २ तासांपर्यंत उशिराने धावत आहे
railway sation


पुणे, 28 एप्रिल (हिं.स.)। पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळपासून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तांत्रिक कारणांमुळे आणि ऑपरेशनल अडचणींमुळे तब्बल ८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर अनेक गाड्या २ तासांपर्यंत उशिराने धावत आहेत. तर पुणे लोणावला लोकल शिवाजीनगर स्टेशनवरुन सुटणार आहेत.

पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या लोकल गाड्या आता शिवाजीनगर स्थानकावरून सुटत आहेत त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त प्रवास करून शिवाजीनगर गाठावे लागत आहे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. मंगळवारी सकाळपासून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. सोमवारी सायंकाळी पुणे स्टेशनजवळ मुंबई-सोलापूर वंदे भारतच्या बोगीचे एक चाक रुळावरुन घसरल्याने मोठा गोंधळ उडाला होता. आज पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला जाणाऱ्या गाड्या उशिरा धावत आहेत, पुणे -निजामुद्दीन, सीएसएमटी– कोल्हापूर, सीएमसीटी– बेंगलोर या गाड्यांचे वेळापत्रक रिसिड्युल करण्यात आले आहे.ल्वेचे जनसंपर्क अधिकारी हेमंत बेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दुपारनंतर परिस्थिती हळूहळू सुरळीत होण्याची शक्यता आहे.” पुण्यातील रेल्वे वाहतूक तात्पुरती विस्कळीत झाली असली तरी दुपारनंतर परिस्थिती सुधारेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे. प्रवाशांनी संयम बाळगून अपडेट्स तपासत राहावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande