१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट तातडीने कमी करा - खा. सोनवणे
बीड, 28 एप्रिल, (हिं.स.)। १५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट तातडीने कमी करा. रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट व ठोस निर्देश खासदार बजरंग सोनवणे यांनी दिले. मागील दोन वर्षांत अहमदनगर-
अ


बीड, 28 एप्रिल, (हिं.स.)। १५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट तातडीने कमी करा. रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट व ठोस निर्देश खासदार बजरंग सोनवणे यांनी दिले. मागील दोन वर्षांत अहमदनगर-बीड-परळी रेल्वे कामाला गती दिली आहे. आता हे काम युद्धपातळीवर पूर्ण करून १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुणे ते परळी रेल्वे धावलीच पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका आहे.

बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण मार्ग, अपघातप्रवण ब्लॅकस्पॉट, निकृष्ट दर्जाची कामे, भूसंपादन, बायपास, उड्डाणपूल, रोड ओव्हर ब्रिज, फूटओव्हर ब्रिज तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणींचा सखोल आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले.

अंबाजोगाई, केज, नेकनूर, मांजरसुंबा, पाटोदा, माजलगाव या शहरांभोवती बायपास व उड्डाणपूल उभारणीस प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण चौकात फूटओव्हर ब्रिज उभारणी तसेच विविध राष्ट्रीय महामार्गांच्या दुहेरीकरणाची कामे गतीने पूर्ण करण्याबाबतही निर्देश दिले.

पालखी मार्गावरील खराब रस्ते, धारूर घाटातील अपघातप्रवण ठिकाणे, माजलगाव-धारूर-केज मार्ग, पाटोदा शहरातील अपूर्ण कामे, तसेच बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बार्शी नाका रस्त्याच्या संथ गतीने सुरू असलेल्या कामांबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला व तत्काळ गती देण्याचे आदेश दिले.

रेल्वे विभागाच्या आढाव्यात ३१ मेपर्यंत परळीपर्यंत रेल्वे ट्रॅक पूर्ण करणे, जून महिन्यात रेल्वे चाचण्या घेणे, बीड-नगर-मुंबई व बीड-नगर-पुणे इंटरसिटी सेवा सुरू करणे, घाटनांदूर येथे रेल्वे थांबा मंजूर करणे तसेच धाराशिव-बीड-छत्रपती संभाजीनगर नवीन रेल्वेमार्ग सर्वेक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच प्रवाशांच्या सुविधा वाढविणे, स्थानकांवर मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे यावरही भर देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande