रेणा मध्यम प्रकल्पात ४५ टक्के जलसाठा
लातूर, 28 एप्रिल (हिं.स.)। रेणापूर तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने विहिरी व बोअरच्या पाण्याची पातळी कमी होत असून एप्रिल महिन्यात रेणा प्रकल्पातील जलसाठ्यातून १० सें.मी.ने बाष्पीभवन झाले आहे. सध्या प्रकल्पात आता अवघा ४५. ५० टक्केच जल
रेणा प्रकल्प


लातूर, 28 एप्रिल (हिं.स.)। रेणापूर तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने विहिरी व बोअरच्या पाण्याची पातळी कमी होत असून एप्रिल महिन्यात रेणा प्रकल्पातील जलसाठ्यातून १० सें.मी.ने बाष्पीभवन झाले आहे. सध्या प्रकल्पात आता अवघा ४५. ५० टक्केच जलसाठा उपलब्ध असल्यामुळे या धरणावरील नळ योजनांनी आतापसूनच पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे.

रेणापूर तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा कहर पाहायला मिळणार आहे. पारा ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. त्यामुळे पाण्याच्या भूजल पातळीमध्ये कमालीची घट होताना दिसत आहे. गत वर्षीच्या पावसाचे प्रमाण लक्षात घेता तालुक्याची भूजल पातळी वाढेल अशी अपेक्षा होती परंतु केवळ पिण्याच्या पाण्याचा व काहीअंशी सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. तालुक्यातील गेल्या काही वर्षाच्या पर्ण्यन्यमानाची स्थिती पाहता दरवर्षी जनतेला नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

तीव्र उन्हामुळे लहान मोठे तलाव, बॅरेजेस व शेततळ्यातील पाण्याचा साठा झपाट्याने कमी होत चालला आहे. यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेऊन आतापासूनच रेणा मध्यम प्रकल्पातील उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज आहे.

पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. गतवर्षी पावसाने तालुक्याची वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी ओलांडली त्यामुळे व्हटी प्रकल्प व लघु प्रकल्पातील जल साठ्यात अपेक्षीत वाढ झाली होती. तसेच निम्मा तालुक्याची तहान भागवणाऱ्या रेणा प्रकल्प हात तुडूब

भरला होता दरम्यान ३१ मार्च अखेर रेणा प्रकल्पात १०.९८ दलघमी जिवंत पाणीसाठा होता. पाण्याची एकूण टक्केवारी ५३. ४१ अशी होती. परंतु एप्रिल महिन्यात २८ दिवसांत १० सें.मी. पाण्याचे बाष्पीभवन होऊन सध्या धरणात ४२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या पाण्यावरच अवलंबून असलेल्या पानगाव बारा खेडी, रेणापूर दहा खेडी, पट्टीवडगाव पाच खेडी, खरोळा या नळयोजनांनी आतापासूनच काटकसरीने पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे, असे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande