लातूर - तगरखेडा ते औराद शहाजानी रस्ता दुरूस्तीस अखेर सुरुवात
लातूर, 28 एप्रिल (हिं.स.)। निलंगा तालुक्यातील तगरखेडा ते औराद शहाजनी या मार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास अखेर सुरुवात करण्यात आली आहे. या संदर्भात माजी सरप
तगरखेडा रस्ता


लातूर, 28 एप्रिल (हिं.स.)। निलंगा तालुक्यातील तगरखेडा ते औराद शहाजनी या मार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले असून रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास अखेर सुरुवात करण्यात आली आहे.

या संदर्भात माजी सरपंच वैजनाथप्पा वलांडे, चेअरमन संजय थेटे, व्हाईस चेअरमन विजयकुमार कलगाणे, माजी चेअरमन रमेश राघो, सोपान बिरादार, उपसरपंच मदन बिरादार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी केली होती. संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने खड्डे बुजविण्याची विनंती करण्यात आली होती.

यावर कार्यकारी अभियंता बिरादार यांनी ४ दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनानुसार संबंधित विभागाने त्वरित हालचाल करीत रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास प्रारंभ केला आहे. रस्त्याची दुरुस्ती सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, तगरखेडकरांच्या वतीने कार्यकारी अभियंता बिरादार यांचे आभार मानण्यात आले आहेत. तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande