मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर एसटी बसचा अपघात; प्रवाशांना किरकोळ दुखापत
रायगड, 28 एप्रिल, (हिं.स.)। मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील खोपोली एक्झीट परिसरात एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून बसचे नुकसान झाले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२.३० वाजण
# मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर एसटी बसचा अपघात; प्रवाशांना किरकोळ दुखापत  खालापूर : मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील खोपोली एक्झीट परिसरात रविवारी (२७ एप्रिल) दुपारी एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून बसचे नुकसान झाले आहे.  पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास एसटी बस क्रमांक एमएच-14 एलएक्स-5825 ही बस खोपोली एक्झीटजवळून जात असताना चालकाने बस वेगाने आणि हयगयीने चालवली. तसेच रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरील डिव्हायडरला धडकली.  या अपघातात बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.  या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चालकाविरोधात मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१ व १२५ (अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.


रायगड, 28 एप्रिल, (हिं.स.)। मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील खोपोली एक्झीट परिसरात एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून बसचे नुकसान झाले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास एसटी बस क्रमांक एमएच-14 एलएक्स-5825 ही बस खोपोली एक्झीटजवळून जात असताना चालकाने बस वेगाने आणि हयगयीने चालवली. तसेच रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावरील डिव्हायडरला धडकली.

या अपघातात बसमधील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.

या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चालकाविरोधात मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१ व १२५ (अ) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande