
छत्रपती संभाजीनगर, 28 एप्रिल (हिं.स.)। कन्नड शहरातील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय जाधव, तर सचिवपदी विजय भोसले यांची सर्वसाधारण सभेत बिनविरोध निवड करण्यात आली.
पतसंस्थेच्या रिक्त पदांसाठी झालेल्या या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. उपाध्यक्षपदी जयश्री सोनार, तर खजिनदारपदी रामनाथ टेकाळे यांची निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील कासतोडे यांनी काम पाहिले. यावेळी व्यासपीठावर
संजय जाधव विजय भोसले मुख्याध्यापिका सुनीता दळवी, कळंकी येथील मुख्याध्यापक मुक्तानंद गोस्वामी, संतोष रिंढे, मीनाक्षी पाटील, गणेश दारवंटे, वैशाली सोळंके, अमोल मोरे, नीलेश देशमुख, नरेंद्र शेजवळ, संजय गोरे, नारायण पुजरोड व संग्राम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या निवडीबद्दल सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis