आ. सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची सदिच्छा भेट
सोलापूर, 28 एप्रिल (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार सुभाष देशमुख यांच्या सोलापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विविध स्थानिक विकासकामे, प्रलंबित प्रश्
Ufbn


सोलापूर, 28 एप्रिल (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आमदार सुभाष देशमुख यांच्या सोलापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

या प्रसंगी आमदार देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विविध स्थानिक विकासकामे, प्रलंबित प्रश्न तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसंदर्भात सविस्तर व सकारात्मक चर्चा केली.

सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळेल व विकासाच्या दिशेने नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande