मराठवाड्यातील गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध- राधाकृष्ण विखे पाटील
छत्रपती संभाजीनगर, 28 एप्रिल (हिं.स.)जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अंतर्गत ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे’ छत्रपती संभा
अ


छत्रपती संभाजीनगर, 28 एप्रिल (हिं.स.)जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ अंतर्गत ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे’ छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता ही जलयात्रा आता लोकचळवळ बनत असून मराठवाड्यातील सिंचनाचे प्रश्न वेळेत सोडवून गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विचार, वारसा आणि विकास’ या त्रिसूत्रीवर आधारित ही जलयात्रा आयोजित करण्यात आली आहे. जलसंवर्धनाबाबत जनजागृती, लोकसहभाग आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची संकल्पना अधिक बळकट करणे, हा या जलयात्रेचा मुख्य उद्देश आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थान श्रीक्षेत्र चोंडी आणि गोदावरीचे उगमस्थान श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चौंडी येथून एकाच वेळी या दोन ठिकाणांहून जलयात्रेचा शुभारंभकरण्यात आला. शिर्डी येथे दोन्ही एकत्रितपणे छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झाल्या आहेत. वैजापूर येथे आ.रमेश बोरनारे गंगापूर मध्ये आ.प्रशांत बंब यांनी यात्रेचे स्वागत केले. यात्रेच्या निमिताने मांडण्यात आलेल्या सिंचनाच्या समस्याबाबत लवकरच निर्णय होतील असे त्यांनी आश्वासित केले.

पालकमंत्री मंत्री संजय शिरसाठ यांनी जलयात्रीचे स्वागत केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध ठिकाणी यात्रेच्या स्वागतासाठी स्वागत कक्ष उभारण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमाचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. खा.रामराव वडतुके आ. गोपीचंद पडळकर आ. सदाभाऊ खोत यांच्यासह नागरिक उपस्थित होते.खा. संदीपान भुमरे आणि आ.विलास भुमरे स्वागतासाठी उपस्थित होते. फुलंब्रीमध्ये आ.अनुराधा चव्हाण यांच्या वतीने यात्रेचे स्वागत झाले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जल व्यवस्थापनाचे केलेले कार्य हे आमच्यासाठी आदर्शवत असल्यामुळे त्यांच्या नावाने सुरू केलेली यात्रा निश्चित राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande