
लातूर, 28 एप्रिल (हिं.स.) : शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालत मतदारसंघातील कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘समृद्ध शेतकरी अभियान’ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या अभियानाचा प्रभाव मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात दिसून येत आहे.
आगामी खरीप हंगामाचे अचूक नियोजन व्हावे, या हेतूने निलंगा, देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंबुलगा मेन, नेकनाळ, गणेशवाडी, हलगरा, अजनी, शिवपूर, आंबेगाव आणि रापका या गावांमध्ये एकाच दिवशी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरांमध्ये कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सोयाबीनचे पंचसूत्र, बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, फळबाग लागवड योजना, शेतकरी अपघात विमा योजना, कृषी यांत्रिकीकरण तसेच जलतारा प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
या प्रसंगी पंचायत समिती सभापती संजय सूर्यवंशी, जि.प. सदस्य तानाजी बिरादार, सरपंच कलावती कोरे, रायाबाई बिरादार, सरपंच योगेश पाटील, उपसरपंच देवानंद तडोळे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच कृषी व महसूल विभागातील अधिकारी आर. ई. कदम, बी. एम. जाधव, सुहास राऊत, गुलाब शेख, एस. आय. लोहारे, आर. जी. मोरे, पी. बी. कांबळे, टी. ए. कांबळे, जी. पी. सूर्यवंशी, बी. एल. गुंजीटे, डी. जी. गुणाले, पापासाहेब यादव, वैराळे, एम. टी. कुकर, ए. व्ही. मेहत्रे, एन. टी. आलापुरे आणि न. स. पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या सर्व गावांमध्ये मोठ्या संख्येने प्रगतशील शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून, त्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेत आगामी हंगामासाठी तयारी सुरू केल्याचे दिसून आले.
------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis