
बीड, 28 एप्रिल, (हिं.स.)। श्री संत गुरुवर्य नारायण बाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सप्ताह सांगता सोहळ्यास आमदार सुरेश धस यांनी उपस्थित राहून श्री तारकेश्वराचे दर्शन घेतले व समाधीस्थळी अभिवादन केले. भाविकांशी संवाद साधत गुरुवर्यांच्या स्मृतींना उजाळा दिला व त्यांच्या आशीर्वादातूनच जनसेवेची प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली.
तारकेश्वर गडावर येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महिंदा ते खडकत रस्त्याच्या सिमेंट काँक्रेटीकरणास राज्य शासनाच्या हॅम योजनेतून मंजुरी मिळाल्याची माहिती देत लवकरच काम सुरू होईल, असा विश्वास दिला.
या प्रसंगी ह.भ.प. तुकाराम महाराज मुंढे, ह.भ.प. रोहिदास महाराज गर्जे, ह.भ.प. अनिल देवळकर महाराज तसेच स्थानिक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis