
बीड, 28 एप्रिल, (हिं.स.)। पाटोदा शहरातील श्री क्षेत्र विठ्ठलगड येथे ह.भ.प. वैराग्यमूर्ती रामकृष्ण रंधवे बापू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संस्थेच्या वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहास आमदार सुरेश धस यांनी उपस्थित राहून भाविकांशी मनमोकळा संवाद साधला आणि ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापू यांचे आशीर्वाद घेतले.
'विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल' या नामाच्या गजरात वारकरी भाविक तल्लीन झाले होते. भक्तिरसात न्हाऊन निघालेले वातावरण, टाळ-मृदंगाचा मधुर नादाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. तसेच या सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही, तर तो सामूहिक भक्तीचा, एकतेचा आणि आत्मशुद्धीचा सोहळा आहे. वारकरी संप्रदायाची ही समृद्ध परंपरा आपल्या महाराष्ट्राची खरी ओळख आहे.
---------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis