पुढील महिन्यात तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्या'च्या कामाचा शुभारंभ होणार
छत्रपती संभाजीनगर, 28 एप्रिल (हिं.स.)। तुळजापूर तीर्थक्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आपले महायुती सरकार सज्ज झाले आहे. आई तुळजाभवानी मातेचे हे शक्तीपीठ जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र व्हावे, हे आपले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे. पुढील महिन
अ


छत्रपती संभाजीनगर, 28 एप्रिल (हिं.स.)। तुळजापूर तीर्थक्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आपले महायुती सरकार सज्ज झाले आहे. आई तुळजाभवानी मातेचे हे शक्तीपीठ जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र व्हावे, हे आपले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरत आहे.

पुढील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत 'तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्या'च्या कामाचा भव्य शुभारंभ होणार आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे श्री तुळजाभवानी मंदिराच्या जतन, संवर्धन आणि विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. सुरू असलेल्या कामांची गती पाहून उर्वरित प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या महायुती सरकारने या विकास आराखड्यासाठी तब्बल २,००० कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे. यामुळे तुळजापूरचा चेहरामोहरा बदलणार आहे.आईच्या आशीर्वादाने लवकरच रेल्वेगाडीही तुळजापूरच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी धावेल, यासाठी आपले प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेतच. श्रद्धा आणि आधुनिक सुविधांची सांगड घालून हे काम केले जात आहे. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आणि आपल्या सर्वांची साथ हीच आपली ताकद आहे!

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande