‘हाय अलर्ट’ व्हायरल मेसेजमागचे सत्य काय? अधिकृत माहिती समोर
रायगड, 28 एप्रिल (हिं.स.)। राज्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध प्रकारचे “हाय अलर्ट” संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या संदेशांमध्ये “तापमान ५५ अंशांपर्यंत जाणार”, “मोबाईल फोन फुटतील”, “सकाळी १० ते दुपारी ३ पर
What is the truth behind the viral message 'High Alert'? Official information out in the open


रायगड, 28 एप्रिल (हिं.स.)। राज्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध प्रकारचे “हाय अलर्ट” संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या संदेशांमध्ये “तापमान ५५ अंशांपर्यंत जाणार”, “मोबाईल फोन फुटतील”, “सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत घराबाहेर पडू नका” अशा अतिरंजित दाव्यांचा समावेश आहे. मात्र, अशा अनेक संदेशांतील माहिती अप्रमाणित असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

भारत हवामान विभागाने (IMD) काही भागांमध्ये उष्णतेबाबत सर्वसाधारण इशारे दिले असले तरी सोशल मीडियावर फिरणाऱ्या संदेशांप्रमाणे कोणतेही सार्वत्रिक आदेश जारी करण्यात आलेले नाहीत. “४५°C ते ५५°C तापमान”, “मोबाईल फुटतील”, “पूर्ण बाहेर पडू नका” यांसारखे दावे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

तसेच “नागरिक संरक्षण महासंचालनालय” या नावाने संदेश प्रसारित होत असले तरी अशा नावाची अधिकृत भारतीय संस्था असल्याचा स्पष्ट पुरावा उपलब्ध नसल्याचेही समोर आले आहे.

दरम्यान, नागरिकांनी उष्णतेच्या काळात योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान शक्यतो कडक उन्हात जाणे टाळावे, भरपूर पाणी, ताक, लिंबूपाणी व नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ घ्यावेत, हलके व सूती कपडे वापरावेत, तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

वाहनांमध्ये लाईटर, परफ्यूम किंवा गॅस कॅन यांसारख्या ज्वलनशील वस्तू ठेवू नयेत. उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची सत्यता अधिकृत हवामान विभाग, जिल्हा प्रशासन किंवा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून तपासून पाहण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande