डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात अनुभवाधारित शिक्षणाचा नवा आदर्श
नांदेड, 29 एप्रिल (हिं.स.)। वैद्यकीय शिक्षणात अनुभवाधारित, कौशल्यकेंद्रित आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापनपद्धती रुजविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिष्ठाता डॉ. सुधीर दे
अ


नांदेड, 29 एप्रिल (हिं.स.)।

वैद्यकीय शिक्षणात अनुभवाधारित, कौशल्यकेंद्रित आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापनपद्धती रुजविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या दूरदर्शी शैक्षणिक नेतृत्वाखाली शरीरक्रियाशास्त्र मॉडेल मेकिंग स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी “भविष्यातील सक्षम व कौशल्यसंपन्न डॉक्टर घडविण्यासाठी अनुभवाधारित आणि विश्लेषणात्मक शिक्षणपद्धती आवश्यक आहे,” असे प्रतिपादन केले.

शरीरक्रियाशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना दुधमल(कंधारे)यांच्या अभिनव संकल्पना, शैक्षणिक नियोजन व प्रभावी अंमलबजावणीमुळे हा उपक्रम संस्थेच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांपैकी एक ठरला असून, वैद्यकीय शिक्षणात “Learning by Doing” संकल्पनेचे प्रभावी उदाहरण म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे.

प्रथम वर्ष एमबीबीएसच्या २० गटांतील १५१ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेत मानवी शरीरक्रियेतील गुंतागुंतीच्या संकल्पना वैज्ञानिक, त्रिमितीय आणि नाविन्यपूर्ण मॉडेल्सद्वारे सादर केल्या. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचारशक्ती आणि सर्जनशीलतेचे प्रभावी दर्शन या स्पर्धेत घडले.

अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण व आधुनिक वैद्यकीय शिक्षणासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविले जात असून, विद्यार्थ्यांना पारंपरिक अध्यापनाबरोबरच अनुभवाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे.

या दृष्टीकोनातूनच ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आल्याचे मानले जाते.

प्रास्ताविकात डॉ. वंदना दुधमल (कंधारे) यांनी शरीरक्रियाशास्त्र विषय विद्यार्थ्यांसाठी अधिक सुलभ, आकर्षक आणि समजण्यासारखा करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

स्पर्धेतील मानकरी विजेते

प्रथम क्रमांक : गट क्र. ०५ (सर विल्यम मॅडॉक बेलीस) कृत्रिम मूत्रपिंड आणि

डायलिसिस , द्वितीय क्रमांक : गट क्र. १५ (लुईस अँटोइन रनवीर) प्रकाश प्रतिक्षेप, तृतीय क्रमांक गट क्र. ०७ जॉन स्कॉट हलदणे- प्रतिप्रवाह यंत्रणा

स्पर्धेचे परीक्षण डॉ. वैशाली इनामदार, डॉ. किशोर राठोड, डॉ. वैष्णवी कुलकर्णी, डॉ. समीर व डॉ. बोडके यांनी केले. कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कापसे, उपअधिष्ठाता डॉ. शितल राठोड तसेच विविध विभागांतील प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande