जालन्यात भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न
जालना, 29 एप्रिल (हिं.स.)। अखिल भारतीय क्षत्रिय राजपूत बरवाल समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सामूहिक विवाह सोहळ्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या मंगलमय प्रसंगी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विशेष उपस्थि
Q


जालना, 29 एप्रिल (हिं.स.)।

अखिल भारतीय क्षत्रिय राजपूत बरवाल समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सामूहिक विवाह सोहळ्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या मंगलमय प्रसंगी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवून नवविवाहित दाम्पत्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या सामूहिक विवाह सोहळ्यात विविध भागांतून आलेल्या वधू-वरांनी पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात अडकत नवजीवनाची सुरुवात केली. कार्यक्रमात सामाजिक एकोप्याचे आणि ऐक्याचे दर्शन घडले.

यावेळी मनपा उपमहापौर राजेश राऊत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भास्कर आंबेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही नवदांपत्यांना शुभेच्छा देत समाजाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल भारतीय क्षत्रिय राजपूत समाजाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

सामूहिक विवाह सोहळ्यामुळे सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा आधार मिळत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे समाजात एकोप्याचा संदेश जात असून अशा कार्यक्रमांची परंपरा पुढेही कायम ठेवावी, असे आवाहन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande