परभणी : बसची दुचाकीला धडक; एक जण गंभीर जखमी
परभणी, 29 एप्रिल, (हिं.स.)।मानवत शहरातील बाह्यवळण रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या ‘शिवाई’ बसने दुचाकीला धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड-बीड मार्गावरील एमएच 49 बीझ
परभणी : बसची दुचाकीला धडक; एक जण गंभीर जखमी


परभणी, 29 एप्रिल, (हिं.स.)।मानवत शहरातील बाह्यवळण रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या ‘शिवाई’ बसने दुचाकीला धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड-बीड मार्गावरील एमएच 49 बीझेड 7219 क्रमांकाची ‘शिवाई’ एसटी बस परभणीहून पाथरीकडे जात होती. त्याचवेळी भगवान पाथरीकर हे एमएच 22 एएच 4855 क्रमांकाच्या दुचाकीवरून मानवत रोडकडे जात असताना बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत पाथरीकर गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने मानवत येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना परभणी येथे हलविण्यात आले. या अपघातामुळे काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande