छ. संभाजीनगर - नामनिर्देशित स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्राचे वितरण
छत्रपती संभाजीनगर, 29 एप्रिल, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयातील प्रशासकीय समिती सभागृहात नामनिर्देशित स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजे
अ


छत्रपती संभाजीनगर, 29 एप्रिल, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयातील प्रशासकीय समिती सभागृहात नामनिर्देशित स्वीकृत सदस्यांना प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर आयुक्त अमोल येडगे यांच्या हस्ते सदस्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

प्रमाणपत्रांसह सदस्यांना महापालिकेची सेरेमोनियल कॅप, शाल, जुट बॅग आणि सभागृहाच्या कामकाज व नियमावलीवर आधारित पुस्तक भेट देत सन्मानित करण्यात आले. प्लास्टिकविरोधी संदेश देत जुटच्या पिशव्यांद्वारे पर्यावरणपूरकतेचा विचारही अधोरेखित करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्या सदस्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. महानगरपालिकेच्या विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आवाहनही करण्यात आले. कार्यक्रमास गटनेता (भाजप) गोविंद केंद्रे, गटनेता (शिवसेना शिंदे गट) किशोर नागरे, गटनेता (एआयएमआयएम) हाजी शेर खान, गटनेता (शिवसेना उबठा) गणेश लोखंडे तसेच उपआयुक्त व नगरसचिव नंदकिशोर भोंबे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande