चिपळूण परिसराला भूकंपाचा धक्का
रत्नागिरी, 29 एप्रिल, (हिं. स.) : चिपळूण परिसराला आज, 29 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का मिळाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. भूकंपाची तीव्रता 2.7 रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू चिपळूण तालु
भूकंप परिसराचा नकाशा


रत्नागिरी, 29 एप्रिल, (हिं. स.) : चिपळूण परिसराला आज, 29 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का मिळाल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

भूकंपाची तीव्रता 2.7 रिश्टर स्केल एवढी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू चिपळूण तालुक्यातील येगाव परिसरात होता. भूकंपाने कोणती हानी झाली का, याबाबतचा तपशील उपलब्ध झालेला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande