परभणीत बुद्ध पौर्णिमेनिमित्त 1 मे रोजी मांडाखळीत भव्य धम्मदेशना सोहळ्याचे आयोजन
देश-विदेशातील भदंतांची राहणार उपस्थिती परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मांडाखळी उमरी परिसरातील नियोजित बुद्ध विहाराच्या दहा एकर परिसरात शुक्रवार 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त सकाळी
परभणीत बुद्ध पौर्णिमेनिमित्त 1 मे रोजी मांडाखळीत भव्य धम्मदेशना सोहळ्याचे आयोजन


देश-विदेशातील भदंतांची राहणार उपस्थिती

परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मांडाखळी उमरी परिसरातील नियोजित बुद्ध विहाराच्या दहा एकर परिसरात शुक्रवार 1 मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त सकाळी 10 वाजता भव्य धम्मदेशना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन थायलंड बुद्ध विहार, बुद्धगया येथील सचिव पूज्य भदंत बोधीविदेश वज्रविशुद्ध यांच्या हस्ते होणार असून प्रमुख धम्मदेशना त्यांच्या वतीने दिली जाणार आहे. तसेच पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, पूज्य भदंत पायबोधी थेरो, भदंत धम्मबोधी, पूज्य भदंत मोगलायन आदी भदंतांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आमदार राजेश विटेकर, माजी आमदार बाबाजानी दुर्रानी तसेच सिने अभिनेते व गगन मलिक फाउंडेशनचे अध्यक्ष गगन मलिक उपस्थित राहणार आहेत.

तथागत बुद्धांच्या प्रज्ञा, मैत्री, करुणा व शांती या विचारांनी विश्वाला प्रकाशमान केले आहे. या मंगलमय विचारांची प्रेरणा घेऊन बुद्ध पौर्णिमेच्या पवित्र दिनी भिक्खू संघाच्या वाणीतून धम्मदेशना ऐकण्यासाठी जास्तीत जास्त उपासक-उपासिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक व आश्रय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande