गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्या; सोनपेठ तालुक्यातील गोभक्तांची मागणी
परभणी, 29 एप्रिल, (हिं.स.)। गोमातेचे संरक्षण व सन्मानासाठी गोमातेला ‘राष्ट्रमातेचा’ दर्जा द्यावा, तसेच देशभरातील कत्तलखाने बंद करावेत, अशी मागणी सोनपेठ तालुक्यातील गोभक्तांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत पाठव
गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्या; सोनपेठ तालुक्यातील गोभक्तांची मागणी


परभणी, 29 एप्रिल, (हिं.स.)। गोमातेचे संरक्षण व सन्मानासाठी गोमातेला ‘राष्ट्रमातेचा’ दर्जा द्यावा, तसेच देशभरातील कत्तलखाने बंद करावेत, अशी मागणी सोनपेठ तालुक्यातील गोभक्तांनी राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी जय श्रीराम गो शाळेचे संचालक काका महाराज कदम, सामाजिक कार्यकर्ते सुधीर बिंदू, अॅड. राजकुमार राठोड, डॉ. राहुल राठोड, अॅड. मनोज बोबडे, संत रंगनाथ महाराज प्रतिष्ठानचे बालाजी वांकर, गोमाता सेवक नागनाथ सातभाई यांच्यासह मोठ्या संख्येने गोभक्त उपस्थीत होते. शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande