परभणी - भीम गीत संगीत रजनी सभा मंडपाचे भूमिपूजन 30 एप्रिल रोजी
परभणी, 29 एप्रिल, (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आश्रय सेवाभावी संस्थेच्या वतीने 30 एप्रिल रोजी युगप्रवर्तक अभिवादन सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्यात महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे यांची भीम गीत संगीत रजन
परभणी - भीम गीत संगीत रजनी सभा मंडपाचे भूमिपूजन 30 एप्रिल रोजी


परभणी, 29 एप्रिल, (हिं.स.)। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आश्रय सेवाभावी संस्थेच्या वतीने 30 एप्रिल रोजी युगप्रवर्तक अभिवादन सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्यात महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे यांची भीम गीत संगीत रजनी आयोजित करण्यात आली आहे, त्या अनुषंगाने भीम गीत संगीत रजनी सभा मंडपाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून व कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले.

पूज्य भिक्खू मोगलायन महाबोधी व भंते संघमित्र यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले. यावेळी डॉ. बी. टी. धुतमल, सेवानिवृत्ती पोलीस उपाधीक्षक भीमराव शिंगाडे, जेष्ठ नेते सिद्धार्थ भराडे, आयोजक सिद्धार्थ हत्तीअंबिरे, नगरसेवक आकाश लहाने, मनपा समाज कल्याण सभापती राजेश रणखांबे, नगरसेवक बबलू घागरमाळे, डॉ सुनील तुरुकमाने, सुधीर कांबळे, मिलिंद घुसळे, मिलिंद खिल्लारे, संदीप हिवाळे, अक्षय जगताप, मकरंद बानेगावकर उपस्थित होते.

दरम्यान, मागील 22 वर्षापासून आश्रय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या आयोजनात भीम गीत संगीत रजनी च्या माध्यमातून महामानवास अभिवादन केले जाते. यावर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande