अंगाला लावण्याचा साबण खाल्ल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू
नाशिक, 29 एप्रिल (हिं.स.)। अंगाला लावण्याचा साबण खाल्ल्याने एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राणेनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व
अंगाला लावण्याचा साबण खाल्ल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू


नाशिक, 29 एप्रिल (हिं.स.)। अंगाला लावण्याचा साबण खाल्ल्याने एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राणेनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व विनायक द्विवेदी (वय २०, रा. श्रीमंगल कॉम्प्लेक्स, राणेनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी (२७ एप्रिल) पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अथर्वने राहत्या घरी अंगाला लावण्याचा साबण खाल्ला होता. त्यानंतर त्याला जुलाब होऊ लागल्याने त्याची प्रकृती खालावली. त्याचे काका अनिल मिश्रा यांनी त्याला तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले असून याबाबत अधीक तपास इंदिरानगर पोलीस करत आहे .

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande