रत्नागिरीतील मौजे नाचणे येथे केंद्रीय विद्यालय होणार
मुंबई, 29 एप्रिल (हिं.स.) - रत्नागिरी जिल्हयातील मौजे नाचणे येथे नवीन केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नवीन विद्यालयासाठी अडीच हेक्टर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी
रत्नागिरीतील मौजे नाचणे येथे केंद्रीय विद्यालय होणार


मुंबई, 29 एप्रिल (हिं.स.) - रत्नागिरी जिल्हयातील मौजे नाचणे येथे नवीन केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नवीन विद्यालयासाठी अडीच हेक्टर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यामुळे कोकणातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी आणखी एक महत्वाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारने देशात ८५ नवीन केंद्रीय विद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अकोला आणि रत्नागिरीचा समावेश आहे. त्यनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे नाचणे ( म्यु. आत, ता. जि. रत्नागिरी) येथे भारत सरकारच्या केंद्रीय विद्यालय संघटन यांच्या माध्यमातून नवीन केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी या जागेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मौजे नाचणे म्यु. आत येथील सर्व्हे क्रमांक ९३ मधील अडीच हेक्टर जमीन केंद्रीय विद्यालय संगठनास वर्ग दोन धारणाधिकाराने देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामुळे भविष्यात रत्नागिरी जिल्हयात केंद्रीय स्तरावरील आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाशी सुसंगत अशी शिक्षण सुविधा या केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेमुळे उपलब्ध होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande