बीडमध्ये सोमवारी लोकशाही दिन; तक्रारीसाठी करा अर्ज
बीड, 29 एप्रिल (हिं.स.)। जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि.४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज १५ दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. लोकशाह
बीडमध्ये सोमवारी लोकशाही दिन; तक्रारीसाठी करा अर्ज


बीड, 29 एप्रिल (हिं.स.)।

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि.४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज १५ दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा. लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसिलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल.

ज्यांनी यापूर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नयेत. तसेच लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे, आपले सरकार व पी.जी. पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीच्या अंतिम अहवालासह वेळेवर उपस्थित राहावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande