
नाशिक, 29 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याच्या 67 वा स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ शुक्रवार 1 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस संचलन मैदान, नाशिक येथे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सोहळ्यास विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नी, वीरमाता, वीरपिता, शौर्य पुरस्कार विजेते, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी, इतर मान्यवर, विद्यार्थी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV