महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, दि. 1 मे 2026 रोजी सकाळी 8.00 वा. मुख्य शासकीय ध्वजारोहण हे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजन
Q


परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार, दि. 1 मे 2026 रोजी सकाळी 8.00 वा. मुख्य शासकीय ध्वजारोहण हे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्हयाच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे.

परभणी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे ध्वजारोहणाचा सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande