‘पैठणीचा महासंग्राम’ त शितल आदमाने ठरल्या पैठणीच्या मानकरी
परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। झी मराठी आणि एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला भव्य ‘पैठणीचा महासंग्राम’ कार्यक्रम रवलगाव रोड येथील शाळा परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये अंतिम फेरी
‘पैठणीचा महासंग्राम’ त शितल आदमाने ठरल्या पैठणीच्या मानकरी


परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। झी मराठी आणि एल. के. आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला भव्य ‘पैठणीचा महासंग्राम’ कार्यक्रम रवलगाव रोड येथील शाळा परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये अंतिम फेरीत सौ. शितल आदमाने यांनी बाजी मारत पैठणीच्या मानकरी होण्याचा मान मिळविला.

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच ‘तुला जपणार आहे’ या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री अनन्या (तानिष्का विशे) यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. त्यांच्या आगमनामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळ, स्पर्धा व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पैठणी जिंकण्यासाठी महिलांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. अंतिम फेरीत सौ. शितल आदमाने यांनी बाजी मारत पैठणीच्या मानकरी होण्याचा मान मिळविला.

लकी ड्रॉच्या माध्यमातून डॉ. मीनाक्षी रत्नपारखी, सौ. कल्पना आकात, सौ. कल्पना भाभट, सौ. ललिता बामणे, सौ. वनिता चाफेकर, सौ. निर्मलाताई टिपणे तसेच सौ. शेख रुबीना यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. उपस्थित महिलांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

कार्यक्रमास सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे, भाजपा महिला आघाडी ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा सौ. सारिका पारवे, भाजपा महिला आघाडी महानगरच्या जिल्हाध्यक्षा सौ. मनीषा जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. गणेश काटकर, भाजपा महिला तालुकाध्यक्षा सौ. ज्योतीताई मोगल, जिल्हा परिषद सदस्या सौ. प्रिती आशिष डख, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा सौ. निर्मलाताई लिपणे, सौ. आरती अजय डासाळकर तसेच तालुक्यातील महिला पंचायत समिती सदस्या व सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद सदस्या डॉ. सविता रोडगे यांनी निमंत्रक म्हणून विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले असून, महिलांसाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande