
जळगाव,, 29 एप्रिल (हिं.स.) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चाळीसगाव येथे दि. ५ मे रोजी सकाळी १०.०० वाजेपासून प्लेसमेंट ड्राईव्ह संधीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये क्वेस कॉर्प प्रा. लि., पुणे तसेच युवाशक्ती फाउंडेशन, जळगाव यांसारख्या नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यासाठी १०वी, १२वी, बी.कॉम., एम.कॉम., तसेच इतर पदवीधर पात्रता धारक इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी.
नोंदणीकृत उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने लॉग इन करून उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावा. ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखतीच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायं. ६.१५ या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा,
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर