तपोवन व मराठवाडा एक्सप्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे; प्रवाशांना दिलासा
परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तसेच प्रवास अधिक सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने तपोवन व मराठवाडा एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त सामा
तपोवन व मराठवाडा एक्सप्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे; प्रवाशांना दिलासा


परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)।

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तसेच प्रवास अधिक सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने तपोवन व मराठवाडा एक्सप्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्यांमध्ये कायमस्वरूपी अतिरिक्त सामान्य श्रेणी डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तपोवन एक्सप्रेस आणि मराठवाडा एक्सप्रेस या गाड्यांमध्ये प्रत्येकी दोन सामान्य श्रेणीचे डबे वाढविण्यात येणार असून गाडीची एकूण रचना 18 डब्यांवरून 20 डब्यांची करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक 17618/17617 हजूर साहिब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हजूर साहिब नांदेड तपोवन एक्सप्रेसमध्ये दोन अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. ही वाढ हजूर साहिब नांदेड येथून 29 एप्रिल पासून, तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 30 एप्रिल पासून लागू होणार आहे.

तसेच, गाडी क्रमांक 17688/17687 धर्माबाद - मनमाड - धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेसमध्येही दोन अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे 28 एप्रिल पासून दोन्ही दिशांनी जोडण्यात येणार आहेत. या कायमस्वरूपी वाढीमुळे गाड्यांमध्ये आसन क्षमतेत वाढ होऊन प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवास करता येणार आहे. विशेषतः सण-उत्सव तसेच गर्दीच्या काळात होणारी गैरसोय कमी होण्यास मदत होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या सुविधेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande