परभणी - चारठाणा येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा
परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। चारठाणा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर व्हावे, यासाठी येथीलयं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालय, मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
परभणी - चारठाणा येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा


परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)।

चारठाणा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर व्हावे, यासाठी येथीलयं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालय, मुंबई येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने चारठाणा महसूल मंडळाचे सामाजिक, भौगोलिक तसेच निजामकालीन परगणा म्हणून असलेले ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारे महसुली दस्तावेज महसूल मंत्र्यांसमोर सादर केले. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही चारठाण्याच्या भौगोलिक क्षेत्राचे महत्त्व स्पष्ट करत अप्पर तहसील कार्यालयाची गरज अधोरेखित केली.

यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा करत जिल्हाधिकारी, परभणी तसेच महसूल विभागाचे अप्पर सचिव विकास खारगे यांना प्रस्ताव स्वीकृत करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच, चारठाणा येथे लवकरच अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्याबाबत सकारात्मक संकेतही त्यांनी दिले.

या शिष्टमंडळात भाजपा नेते नानासाहेब राऊत, पंचायत समिती सदस्य तहेसीन देशमुख, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष मतीन तांबोळी, दिपक भाग्यवंत, संदीप देशमुख, साबेर पठाण यांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande