
बीड, 29 एप्रिल (हिं.स.)।
माजलगाव मतदारसंघातील साठवण तलाव पिंपरवाडा ता. धारूर जि. बीड येथील जमीन संपादन निधी मागणीचा प्रस्ताव व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, छ. संभाजीनगर यांच्याकडे सादर आहे, अशी माहिती माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली. तसेच मौजे पिंपरवाडा ता. धारूर साठवण तलाव (अतिरिक्त) मोजणी फिस मागणीबाबत जिल्हा जलसंधारण अधिकारी, बीड यांनी प्रस्ताव पाठवला असून सदर जमीन संपादन निधी व अतिरिक्त मोजणी निधीबाबत स्थानिक नागरीकांनी मागणी केली आहे.
तरी सदर निधी मागणीचा प्रस्ताव मंजुर करावा व अतिरिक्त मोजणीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात याबाबत श्री.इंद्रनील नाईक (राज्यमंत्री, मृद व जलसंधारण, उद्योग, सा.बां) यांची भेट घेत पत्र दिले.तातडीने कार्यवाही करण्याबाबत महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, छ. संभाजीनगर यांना मंत्री महोदय यांनी निर्देश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis