पुणे पोलिसांकडून 289 शस्त्र परवाने रद्द; 476 अर्ज फेटाळले
पुणे, 29 एप्रिल (हिं.स.)। पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका दिवसात तब्बल 40 शस्त्र परवाने रद्द केले. नूतनीकरण न करणे, शस्त्राची प्रत्यक्ष गरज नसल्याचे निष्पन्न होणे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीसह इतर विविध कारणांमुळे ही कारवाई करण्यात आल
CP Pune


पुणे, 29 एप्रिल (हिं.स.)। पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका दिवसात तब्बल 40 शस्त्र परवाने रद्द केले. नूतनीकरण न करणे, शस्त्राची प्रत्यक्ष गरज नसल्याचे निष्पन्न होणे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीसह इतर विविध कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अमितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्त म्हणून पदभार हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकूण 289 परवाने रद्द, तर 476 अर्ज फेटाळण्यात आले आहेत रद्द करण्यात आलेल्या परवान्यांमध्ये 2020, 2021 आणि 2022 या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या परवान्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

मागील काही वर्षांत ‘स्वसंरक्षणासाठी परवाना हवा’ असे कारण देत अनेकांनी पिस्तूल परवाने मिळविले होते. मात्र, संबंधितांकडे कोणताही ठोस धोका, धमकी किंवा कायदेशीर आधार नसल्याचे पोलिसांच्या पडताळणीत आढळून आले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता अशा परवान्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande