
परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। अनुसूचित जातींच्या अबकड वर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात बौध्द, चर्मकार, मातंग, एससी व एसटी समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात डी.एन. दाभाडे, रामकिशन कांबळे, नदीम इनामदार, जयप्रकाश इंगोले, एन.जी. खंदारे, रवि सोनकांबळे, सुहास पंडीत, सिध्दार्थ भराडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. त्याद्वारे, उपवर्गीकरणासाठी कोणते सामाजिक व आर्थिक निकष लावण्यात आले आहेत, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर किंवा कोणत्या अभ्यासगटाच्या शिफारशी विचारात घेण्यात आल्या आहेत, याबाबतही पारदर्शकता नसल्याची भावना व्यक्त करीत अनुसूचित जाती उपवर्गीकरण संदर्भातील बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा तसेच अद्ययावत जनगणना होईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, संबंधित निकषांची सविस्तर माहिती जाहीर करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis