अध्यात्मातून जीवनाला शांती व सुरक्षा मिळते - भाग्यश्री बहन
परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। अध्यात्माच्या माध्यमातून जीवनात शांती तसेच सुरक्षा प्राप्त होते, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, किनवट येथील केंद्र संचालिका भाग्यश्री बहन यांनी केले. समाजाच्या सर्वांगीण
अध्यात्मातून जीवनाला शांती व सुरक्षा मिळते - भाग्यश्री बहन


परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)।

अध्यात्माच्या माध्यमातून जीवनात शांती तसेच सुरक्षा प्राप्त होते, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, किनवट येथील केंद्र संचालिका भाग्यश्री बहन यांनी केले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कर्मफळ प्रतिष्ठान, परभणीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून ज्ञानोबा सुरवसे यांच्या गृहप्रवेशानिमित्त कर्करोग प्रतिबंधक शिबिर तसेच ‘जीवन सुंदर जगावे कसे’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी डॉ. सिद्धार्थ वसेकर यांनी सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यातून उद्भवणारे आजार याबाबत मार्गदर्शन केले. कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून बचावासाठी वेळेवर काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाग्यश्री बहन यांनी आपल्या मार्गदर्शनात अध्यात्माच्या माध्यमातून मनःशांती आणि जीवनातील स्थैर्य मिळवता येते, असे सांगितले. त्यांच्या संस्थेमार्फत सात दिवसांचे प्रशिक्षण दिले जात असून, त्याचा लाभ घेऊन सकारात्मक व संतुलित जीवन जगता येते, असेही त्यांनी नमूद केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande