त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर सृष्टी प्रकल्पाचे पिंपरीत भूमिपूजन संपन्न
पुणे, 29 एप्रिल (हिं.स.)। त्यागमूर्ती मातारमाई भीमराव आंबेडकरया संघर्ष,त्याग आणि समर्पणाची जिवंत प्रतिमा होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतत्यांनीडॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या मानवमुक्तीच्या महान कार्याला खंबीर साथ दिली. बाबासाहेबांनी देशाला विचार,स
gfd


पुणे, 29 एप्रिल (हिं.स.)। त्यागमूर्ती मातारमाई भीमराव आंबेडकरया संघर्ष,त्याग आणि समर्पणाची जिवंत प्रतिमा होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतत्यांनीडॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या मानवमुक्तीच्या महान कार्याला खंबीर साथ दिली. बाबासाहेबांनी देशाला विचार,संविधान आणि स्वाभिमान दिला,पण त्या विचारांना उभं राहण्यासाठी जी शांत,नि:स्वार्थ ताकद लागते,ती रमाईंच्या रूपाने त्यांच्या पाठीशी होती. म्हणूनच पिंपरी येथे उभारण्यात येणारे माता रमाईंचे स्मारक म्हणजे केवळ एक वास्तू नसून त्याग,स्त्रीशक्ती आणि सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासाचे प्रेरणास्थान आहे,असे प्रतिपादनकेंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्रीरामदास आठवले यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीमसृष्टी) लगतच्या मोकळ्या जागेत उभारण्यात येणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टीचे भूमिपूजन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे होते.

भूमिपूजन सोहळ्यास आमदार महेश लांडगे,उमा खापरे,शंकर जगताप, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,उपमहापौर शर्मिला बाबर,अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, माजी मंत्री विजय गिरकर,सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे,स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे,विधी समिती सभापती सुजाता बोराटे,शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर,महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे,माजी महापौर तथा नगरसदस्य योगेश बहल,डॉ. वैशाली घोडेकर, शंकुतला धराडे, नगरसदस्य सिद्धार्थ बनसोडे,सारिका मासुळकर, राहुल भोसले, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, कुशाग्र कदम, तुषार हिंगे, नगरसदस्य शत्रुघ्न काटे,राहुल कलाटे,डॉ. सुहास कांबळे, धर्मपाल तंतरपाळे,कुणाल व्हावळकर,बाबासाहेब त्रिभुवन,कुंदन गायकवाड,निलेश नेवाळे,सारिका गायकवाड,निकिता कदम,सोनम मोरे,रेश्मा भुजबळ,श्रुती वाकडकर,तृप्ती कांबळे,प्रियांका कुदळे,योगिता बारणे,अर्चना सस्ते, माजी नगरसेवक विकास डोळस,मारुती भापकर, अंकुश कानडी, माजी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह पुणे महापालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसदस्य निलेश आल्हाट तसेच सहशहर अभियंता मनोज सेठिया,उप आयुक्त अण्णा बोदडे,सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे,विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande