येलदरी धरणातील पाणीसाठ्यात घट; वाढत्या तापमानाचा मोठा फटका
परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। मराठवाड्यातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाणारे येलदरी धरण सध्या घटत्या पाणीसाठ्यामुळे चर्चेत आले आहे. राज्यात वाढत्या उष्णतेचा परिणाम आता जलसाठ्यावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. येलदरी धरणातील पाणीसाठा
अ


परभणी, 29 एप्रिल (हिं.स.)। मराठवाड्यातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाणारे येलदरी धरण सध्या घटत्या पाणीसाठ्यामुळे चर्चेत आले आहे. राज्यात वाढत्या उष्णतेचा परिणाम आता जलसाठ्यावर स्पष्टपणे दिसू लागला आहे. येलदरी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून गेल्या आठ दिवसांत पाण्याची पातळी 0.12 मीटरने घटल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणीपुरवठा तसेच जनावरांसाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पूर्णा नदीवर बांधण्यात आलेले हे धरण परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात स्थित असून 1968 साली त्याचे उद्घाटन झाले होते. सुमारे 703 दशलक्ष घनमीटर पेक्षा अधिक पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या या धरणावर परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठी मोठा आधार आहे. याशिवाय येथे जलविद्युत निर्मिती प्रकल्प कार्यरत असून हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणूनही विकसित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी धरणातील पाण्याची पातळी 458.84 मीटर इतकी होती व पाणीसाठा 65.34 टक्के होता. मात्र, रविवारी (दि. 25 एप्रिल) सकाळी घेतलेल्या मोजणीनुसार ही पातळी 457.72 मीटरपर्यंत घसरली असून पाणीसाठा 64.02 टक्क्यांवर आला आहे. या घटत्या पातळीमुळे प्रशासन आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचा थेट परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर होत आहे. विशेषतः एप्रिल महिन्याच्या अखेरीस तापमान उच्चांक गाठत असल्याने पाण्याची घट अधिक वेगाने होत असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

येलदरी धरणावर अवलंबून असलेल्या गावांसाठी ही स्थिती चिंताजनक ठरत आहे. पाणीसाठ्यातील सातत्याने होत असलेल्या घटेमुळे येत्या काही दिवसांत पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीसाठी होणार्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने योग्य नियोजन करून पाणीवाटपावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

येलदरी धरणामुळे मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेतीसाठी सिंचनाची सोय झाली आहे. हे धरण दरवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरते, ज्यामुळे रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पाणी उपलब्ध होते.

दरम्यान, स्थानिक प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक पाणी वाया घालवू नये, पाणी बचत हीच काळाची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

आठ दिवसांत 0.12 मीटर पाण्याची घट...

गेल्या आठ दिवसांत धरणातील पाण्याची पातळी 0.12 मीटरने घटली असून पाणीसाठा 65.34 टक्क्यांवरून 64.02 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनात वाढ होत असून त्याचा परिणाम जलसाठ्यावर होत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणार्या पाण्यावरही संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande