रत्नागिरी : जिल्हा परिषद कामवाटप समितीची ५ मे रोजी सभा
रत्नागिरी, 29 एप्रिल, (हिं. स.) : जिल्हा परिषदेच्या सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थांसाठी काम वाटप समितीची सभा मंगळवार, दि. ५ मे रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही सभा जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सभागृहात होणार अस
रत्नागिरी : जिल्हा परिषद कामवाटप समितीची ५ मे रोजी सभा


रत्नागिरी, 29 एप्रिल, (हिं. स.) : जिल्हा परिषदेच्या सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थांसाठी काम वाटप समितीची सभा मंगळवार, दि. ५ मे रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

ही सभा जिल्हा परिषदेच्या कै. शामराव पेजे सभागृहात होणार असल्याची माहिती काम वाटप समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली.

या सभेमध्ये १० लाखांच्या आतील कामांचे वाटप करण्यात येणार आहे. मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता (विद्युत) तसेच सुशिक्षित बेरोजगार अभियंता (स्थापत्य) यांच्यासाठी काम वाटप करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande