अमरावती : हनुमान भक्ताने ओढल्या ९ बंड्या !
बडनेरा येथील बारीपुर्यात शंभर वर्षाची परंपराअमरावती, 03 एप्रिल (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा इथल्या जुन्या वस्तीमधील बारीपुरा परिसरातील हनुमान मंदिरापासून एका भाविकाने भरगच्च भरलेल्या ९ बंड्या ओढल्या. हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील मोठी गर्
हनुमान भक्ताने ओढल्या ९ बंड्या ! बडनेरा येथील बारीपुर्यात शंभर वर्षाची परंपरा


बडनेरा येथील बारीपुर्यात शंभर वर्षाची परंपराअमरावती, 03 एप्रिल (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील बडनेरा इथल्या जुन्या वस्तीमधील बारीपुरा परिसरातील हनुमान मंदिरापासून एका भाविकाने भरगच्च भरलेल्या ९ बंड्या ओढल्या. हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील मोठी गर्दी जमली होती. गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा या ठिकाणी हनुमान जन्माच्या दिवशी जोपासली जात आहे. रूपलाल जाट या हनुमान भक्ताने ही परंपरा सुरू केली. बारीपुऱ्यातील हनुमान मंदिरात हा भक्त नियमित सेवा देत आहे.

हनुमान मंदिराच्यावतीने दरवर्षी बडनेऱ्याच्या बारीपुऱ्यात शंभर वर्षांची परंपरा हनुमान जन्माच्या दिवशी बंड्या ओढण्याचा कार्यक्रम होत असतो. भाविकाच्या गर्दीने भरगच्च भरलेल्या बंड्या एकट्या हनुमान भक्ताने पाचशे मीटर अंतरापर्यंत ओढल्या जातात. 'जय श्रीराम' जय हनुमान' गजर भाविक भक्तामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मोठ्या संख्येने भाविक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. एकटा हनुमान भक्त सलग पाच वर्षे गाड्या ओढत असतो. या भक्ताचे यंदाचे तिसरे वर्ष राहणार आहे.तत्पूर्वी संस्थानच्यावतीने हनुमान जन्माच्या दिवशी सकाळी भव्य मिरवणूक काढल्या जाते. त्यानंतर हनुमान मंदिरात गोपाळकाल्याचे कीर्तन व भव्य महाप्रसाद वितरण करण्यात येते.रेल्वे फाटक ते हनुमान मंदिर असे पाचशे मीटर अंतर हनुमान भक्त एकटा नऊ गाड्या ओढण्याचा कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. यासाठी अमरावती येथून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande