
पुणे, 03 एप्रिल (हिं.स.)।
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माेशी येथे उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्पामुळे दरराेज एक हजार टन सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्याने आणि वाढत्या लोकसंख्येबरोबरच कचऱ्याचे प्रमाण वाढत असल्याने महापालिकेने सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प (डीबीओटी) तत्त्वावर दुसरा प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे भविष्यात कचरा समस्या निर्माण होणार नाही, असा दावा पर्यावरण विभागाने केला.
शहरातील घरोघरचा कचरा संकलित करून मोशीतील डेपोत टाकला जातो. गेल्या ३५ वर्षांपासूनचा कचरा येथे साचला आहे. ८१ एकर क्षेत्रातील डेपोत कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. हे डोंगर बायोमायनिंगद्वारे हटविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शहराची लोकसंख्या ३३ लाखांवर पोहोचली असून, दररोज १४०० टन कचरा जमा होतो. कचऱ्याची समस्या गंभीर होऊ नये म्हणून महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले. त्यात कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आणखी तसा आणखी एक प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प (डीबीओटी) तत्त्वावर उभारण्याचे नियोजन असल्याचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु