इराणची अमेरिकेला पाषाणयुगापेक्षाही मागच्या युगात पाठवण्याची उघडपणे धमकी
तेहरान, 03 एप्रिल (हिं.स.)।मध्य पूर्वेमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला तणाव आता अधिक धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. हा संघर्ष आता फक्त दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर अनेक देशांमध्ये पसरताना दिसत आहे.या दरम्यान, इराणचे लष्करी
इराणची अमेरिकेला पाषाणयुगापेक्षाही मागच्या युगात पाठवण्याची उघडपणे धमकी


तेहरान, 03 एप्रिल (हिं.स.)।मध्य पूर्वेमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला तणाव आता अधिक धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. हा संघर्ष आता फक्त दोन देशांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर अनेक देशांमध्ये पसरताना दिसत आहे.या दरम्यान, इराणचे लष्करी कमांडर अली जहांशाही यांनी अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, जर अमेरिकेने हल्ला केला तर त्यांच्या सैनिकांना पाषाणयुगापेक्षाही मागच्या काळात पाठवले जाईल. तसेच त्यांनी असेही सांगितले की इराणची भूमी ही आक्रमणकर्त्यांची कबर आहे आणि इराणी सैन्य पूर्णपणे सज्ज आहे.

दरम्यान, इराकची राजधानी बगदाद येथील अमेरिकन दूतावासाने हाय अलर्ट जारी केला आहे. इराण समर्थित मिलिशिया पुढील २४ ते ४८ तासांत हल्ला करू शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकन नागरिकांना तात्काळ इराक सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याचवेळी इराणकडून इस्रायलवर सातत्याने क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. इस्रायली सैन्याच्या माहितीनुसार, सहा तासांच्या आत चार वेळा क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला, ज्यामध्ये वेगवेगळ्या भागांना लक्ष्य करण्यात आले. इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टमने अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली, मात्र काही हल्ले देशाच्या मध्य भागात पडले. या हल्ल्यांमध्ये काही नागरिक किरकोळ जखमी झाले.

परिस्थिती आणखी गंभीर झाली जेव्हा इराण समर्थित लेबनानमधील संघटना हिजबुल्लाह यांनीही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी उत्तर इस्रायलमध्ये रॉकेट आणि ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांनंतर अनेक भागांत सायरन वाजू लागले आणि नागरिकांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला. त्यामुळे हा संघर्ष संपूर्ण प्रादेशिक युद्धात बदलण्याची भीती वाढली आहे.या संघर्षाचा परिणाम खाडी प्रदेशातही दिसून आला. अबू धाबी येथे खलिफा इकॉनॉमिक झोनजवळ एक क्षेपणास्त्र हवेतच पाडण्यात आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हा संघर्ष आता महत्त्वाच्या आर्थिक भागांपर्यंत पोहोचत असल्याचे संकेत मिळाले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणवरील हल्ले आणखी तीव्र केले जातील, असे म्हटले आहे. अमेरिकेने आधीच इराणची लष्करी क्षमता मोठ्या प्रमाणात कमकुवत केली असल्याचा दावा त्यांनी केला.या तणावाचा परिणाम जागतिक बाजारावरही झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये ४% पेक्षा जास्त वाढ झाली असून आशियाई बाजारांमध्ये घसरण दिसून आली आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे तेल पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे.

दरम्यान, येमेनमधील इराण समर्थित हूती संघटनेने इस्रायलमधील जाफा परिसरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा केला आहे. संघटनेचे प्रवक्ते यहिया सरी यांनी सांगितले की हा हल्ला त्यांच्या सहयोगी गटांसोबत समन्वय साधून करण्यात आला.इस्रायली सैन्यानेही येमेनमधून क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची पुष्टी केली असून त्यांना रोखण्यासाठी एअर डिफेन्स सिस्टम सक्रिय करण्यात आली आहे. नागरिकांना सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande