छ. संभाजीनगर - डॉ. हेडगेवार रुग्णालयात 'बेनिफिशियरी कॉन्क्लेव्ह' उत्साहात
छत्रपती संभाजीनगर, 03 एप्रिल, (हिं.स.)। डॉ. हेडगेवार रुग्णालय येथे नेत्ररोग विभागातर्फे ''बेनिफिशियरी कॉन्क्लेव्ह'' उत्साहात पार पडली. चिंतामण परांजपे व्हिजन एन्डोवमेंट प्रकल्पाच्या माध्यमातून तीन वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या प्रीमॅच्युअर बाळा
छ. संभाजीनगर - डॉ. हेडगेवार रुग्णालयात 'बेनिफिशियरी कॉन्क्लेव्ह' उत्साहात


छत्रपती संभाजीनगर, 03 एप्रिल, (हिं.स.)। डॉ. हेडगेवार रुग्णालय येथे नेत्ररोग विभागातर्फे 'बेनिफिशियरी कॉन्क्लेव्ह' उत्साहात पार पडली. चिंतामण परांजपे व्हिजन एन्डोवमेंट प्रकल्पाच्या माध्यमातून तीन वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या प्रीमॅच्युअर बाळांमध्ये आढळणारा डोळ्यांचा आजार 'रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी', कमी दृष्टी (लो व्हिजन) व पुनर्वसन, तसेच कम्युनिटी ऑप्थल्मोलॉजीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

उपक्रमांतर्गत आतापर्यंत ३००० हून अधिक बाळांची 'रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी' तपासणी करण्यात आली. ४५२ बाळांना हा त्रास होता आणि १७० बाळांच्या दोन्ही डोळ्यांना उपचाराची गरज होती. यामध्ये एकूण ४४६ प्रोसिजर करण्यात आल्या. योग्य वेळी उपचार मिळाल्याने या बाळांची दृष्टी वाचवण्यात यश आले. कार्यक्रमास युनिसेफचे राज्यप्रमुख डॉ. संजय सिंह आणि युनिसेफच्या आरोग्य विभागाचे डॉ. मंगेश गधारी यांची प्रमुख उपस्थिती होती. फूट सोल्जर फॉर हेल्थ, माधव नेत्रालय, विवेकानंद हॉस्पिटल, श्री गुरुजी रुग्णालय यांनीही सहभाग नोंदविला.

'बेनिफिशियरी कॉन्क्लेव्ह' मध्ये विश्वस्त डॉ. अनंत पंढरे, प्रकाश परांजपे, डॉ. अनिल कौल, डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, डॉ. महेश देशपांडे, डॉ. स्वाती शिरडकर विशेष आमंत्रित प्रकाश परांजपे होते. निरीक्षक म्हणून प्रा. डॉ. अनिल कौल यांनी काम पाहिले. रुग्णालयातर्फे कार्यवाह डॉ. अश्विनीकुमार तुपकरी, वैद्यकीय संचालक डॉ. महेश देशपांडे, विश्वस्त डॉ. अनंत पंढरे, अधिष्ठाता डॉ. स्वाती शिरडकर व प्रकल्प प्रमुख डॉ. अभिज्ञा सुर्वे आदींनी मार्गदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande