नांदेड - सोनू कल्याणकर खुन प्रकरणातील चार आरोपींना अटक
नांदेड, 07 एप्रिल (हिं.स.)। नांदेड शहरातील श्रीनगर येथे झालेल्या खुन प्रकरणांचा झडा लावण्यात पोलिसांना यश आले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीत तीन अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश आहे. दरम्यान एका आरोपीला ताब्यात घेण्यासाठी स्थ
नांदेड - सोनू कल्याणकर खुन प्रकरणातील चार आरोपींना अटक


नांदेड, 07 एप्रिल (हिं.स.)। नांदेड शहरातील श्रीनगर येथे झालेल्या खुन प्रकरणांचा झडा लावण्यात पोलिसांना यश आले असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीत तीन अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश आहे. दरम्यान एका आरोपीला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोळीबार करुन जेरबंद केले आहे.

श्रीनगर येथे सोनू कल्याणकर यांच्यावर चार जणांनी खुनी हल्ला करुन ठार केले . सदरील खुनाची घटना समजताच भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला . तसेच घटनास्थळी पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी भेट देऊन पाहणी केली होती. सदर प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करुन अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात येत होता. स्थानिक गुन्हे शाखा व भाग्यनगर व वजिराबाद पोलिसांनी सदर प्रकरणातील गुन्ह्यांची पाश्वभूमी लक्षात घेऊन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या. वजिराबाद पोलिसांनी यातील प्रमुख आरोपी यास ताब्यात घेतले. वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम

यांनी सदर प्रकरणांत आरोपीला अटक केली आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणातील तीन अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेऊन या खुना प्रकरणांचा उलगडा करण्यात आला आहे. नांदेड येथील कारागृहात असलेल्या यांनी सोनू कल्याणकर यांच्या खुनाची टिप दिली होती. गुन्हेगार सोनू कल्याणकर यांनी नवरात्र काळात एका मुलीची छेड काढली होती. त्या कारणावरून मयत सोनू कल्याणकर यांचा खुन करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande