चाकूरमध्ये तंबाखू माफियांवर पोलिसांची धाड; ३.७५ लाखांचा साठा जप्त
लातूर, 07 एप्रिल, (हिं.स.)। जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने चाकूर येथे टाकलेल्या धाडीत प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा ₹3.75 लाखांचा साठा जप्त करत एका आरोपीला
पोलीस कारवाई


लातूर, 07 एप्रिल, (हिं.स.)। जिल्ह्यात अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, स्थानिक गुन्हे शाखेने चाकूर येथे टाकलेल्या धाडीत प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा ₹3.75 लाखांचा साठा जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्वामी विवेकानंद चौक परिसरातील “राज कन्फेक्शनरी” दुकानाच्या पाठीमागील गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी मारुती राजेंद्र सोमवंशी (वय 33, रा. चाकूर) यास ताब्यात घेण्यात आले. गोडाऊनची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये NO.4101 Premium Chewing Tobaccoच्या 16 पोत्या, सुगंधी तंबाखूच्या 6 पोत्या आणि Extra Freshness नावाच्या 3 पोत्यांचा समावेश असून, एकूण किंमत ₹3,75,000 आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे, प्रदीप चोपणे यांनी सहभाग घेतला. तसेच चाकूर पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार बोळंगे यांनीही सहकार्य केले.

सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अंतर्गत चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री हा गंभीर गुन्हा असून, अशा अवैध कृत्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande